मनोरंजन

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने केली आत्महत्या

हल्ली सोशल मीडियावर वेळ घालवणे हे एक व्यसन बनत चालले आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक जण नैराश्याचा सामना देखील करित आहेत. यामध्ये 14 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचा देखील सामावेश आहे. आणि या सोशल मीडियावर आणखी एक प्रकार सध्या वाढला चालला आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिला ट्रोल करणे. या ट्रोलिंगमुळे एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जगभरात #NoBra  मोहिम चालवून चर्चेत आलेली इंटरनॅशनल पॉप स्टार सुलीनं (Sulli)  वयाच्या 25 वर्षी  आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यामुळे  जगभरात खळबळ पसरली आहे. दरम्यान, सुलीने आत्महत्या करणापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. मात्र सुलीही काही काळापासून नैराश्येत होती. याचे कारण होते, सोशल मीडियावर तिच्या #NoBra मोहिमेला केले जाणारे ट्रोल. त्यामुळे तिच्या आत्महत्येसाठी सोशल मीडियावरील ट्रोलिंग कारणीभूत ठरवले जात आहेत.