मनोरंजन

‘या’ वेळेत पुन्हा सुरु होणार रामायण; प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली आहे. आता 21 दिवस घरात बसून करायचे काय असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला आहे. अशातच अनेकांनी सोशल मीडियावर लोकप्रिय मालिका रामायण आणि महाभारत टी.व्हीवर पुन्हा प्रसारीत करावी अशी मागणी केली होती. अशातच आता लोकप्रिय टीव्ही शो रामायण  पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांची माहिती त्यांच्या ट्वीटरवरुन दिली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार रामायण या लोकप्रिय टीव्ही रिटेलिकास्ट 28 मार्चपासून डीडी नॅशनलवर रोज एक एपिसोड सकाळी 9 ते 10 आणि पुन्हा रात्री 9 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे.

रामायण ही दूरदर्शनच्या एकेकाळची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे ही अशी मालिका आहे जिनं इतिहास घडविला आणि या मालिकेत काम करणाऱ्य़ा कलाकारांची त्यावेळी वेगळीच चर्चा होती. नुकतीच रामायणची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. कपिल शर्माशी गप्पा मारताना प्रत्येकाने खूप धम्माल केली.