महाराष्ट्र यशोगाथा राजकारण विदर्भ

तब्बल ४२ विद्यापीठांच्या परीक्षा देऊन २० पदव्या मिळवलेला मराठमोळा राजकारणी…

भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती कोण आहे माहितीये ? आपण आपल्या CA, MBBS, MBA च्या पदव्या खूप अभिमानाने सांगतो पण भारतातला सर्वात शिकलेला माणूस आहे ज्याच्याकडे २० हुन अधिक पदव्या आहेत. हा मराठी माणूस सगळ्या भारतीय राजकारण्यांपासून वेगळा ठरतो ते फक्त त्याच्या खूप पदव्यां मुळे…. अश्या या माणसाचं नाव आहे डॉ . श्रीकांत जिचकर.

राजकारण म्हटलं की शिक्षणाचं महत्व आपल्या इथे तस गौणच ! पण आपल्या देशात असा ही एक राजनेता होता ज्याने ४२ विद्यापीठांच्या परीक्षा देऊन २० पदव्या मिळवल्या. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सर्वात तरुण विधायक झालेले श्रीकांत जिचकर हे भारतातील सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती होते. जिचकर हे महाराष्ट्र विधानसभा (१९८२-८५), तसेच महाराष्ट्र विधान परिषद (१९८६-९२) याचे सदस्य होते व त्यांना महाराट्र राज्याचे मंत्री म्हणून निवडले होते . याचबरोबर ते राज्य सभा सदस्य ( १९९२-९८) म्हणून पण निवडून आले होते.

एक राजकारणी म्हणून त्यांची हि कारकीर्द उल्लेखनीय आहेच पण ते अधिक लक्षात राहतात ‘ भारतातील सर्वात उच्च शिक्षित व्यक्ती’ म्हणून … जवळ जवळ १५ पेक्षा लास्ट पदवी असणारे श्रीकांत जिचकर यांची नोंद लिंक बुक ऑफ रेकॉर्ड ने पण घेतली.

नागपूरच्या काटोल तालुक्यात जन्मलेल्या जिचकरांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात मेडिकल डॉक्टर (MBBS) म्हणून केली पुढे त्यांनी LLB, LLM, DBM, MBA या पदव्या मिळवल्या तसेच B.Journ. केले. एवढ्यावरच न थांबता त्यांना एकूण १० विषयात Master’s degree मिळवल्या आहेत. त्यापुढची प्रमाणे:
१. MA समाजशास्त्र,
२. MA मानसशास्त्र,
३. MA इतिहास,
४. MA प्रा. भा. इ . सं . व पुरातत्व,
५. MA अर्थशास्त्र ,
६. MA संस्कृत ,
७. MA इंग्लिश साहित्य,
८. MA लोक प्रशासन,
९. MA तत्वज्ञान,
१०. MA राज्यशास्त्र

याचबरोबर संस्कृत मध्ये D.Lit ही विद्यापीठातील उच्च पदवी देखील त्यांनी मिळवली. एवढेच नवे तर वयाच्या २५ व्य वर्षी परीक्षा देऊन ते IPS झाले. पुढे त्यांनी IAS ची पण तयारी केली. विशेष म्हणजे जिचकरांना बऱ्याच पदव्यांना first merit आणि गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. त्याच्या कडे व्यक्तीगत असा भारतातील सर्वात मोठ ग्रंथालय होत ज्यात ५२,००० पुस्तकं होती. याचबरोबर ते उत्कृष्ट चित्रकार देखील होते, ते स्टेज परफॉर्म आणि प्रॉफेशनल चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. २० पेक्षा जास्त पदव्या असणाऱ्या जिचकरांना वेगवेगळ्या विषयात देखील रुची होती. ते जगभरात फिरून स्वास्थ, व्यायाम, अर्थशास्त्र आणि धर्म या विषयावर बोलत असत.

भारतातला हा सर्वात शिक्षित माणूस म्हणजे एक अद्भुत रसायनच होत. सगळ्यात प्रभूत्व मिळवणारे श्रीकांत जिचकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारतीयांसाठी एक अभिमान होते. सगळ्यांसाठी प्रेरणा ठरेल अस त्यांचं आयुष्यमात्र फार कमी होत.

या भारताच्या उच्च शिक्षित विद्वानांचा अंत २००४ मध्ये एका अपघातात वयाच्या ४९ व्या वर्षी झाला . ‘श्रीकांत जिचकर ‘ हे मराठी नाव त्यांच्या उच्चतम शिक्षणामुळे भारतीयांसाठी कायमच प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *