काम-धंदा विदेश शेती

बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली तब्ब्ल इतक्या एकरची शेतजमीन 

माइक्रोसाॅफ्टचे  संस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकेतील विविध 18 राज्यात तब्बल 2 लाख 42 हजार एकर शेतीची जमीन खरेदी केली आहे. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार या जमिनीवर ते स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार करीत आहेत. बिल यांनी शेतीच्या जमिनीव्यतिरिक्त अनेक जमिनी खरेदी करुन ठेवल्या आहेत.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार बिल गेट्स यांनी एरिजोनामधील जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याची योजना केली आहे. बिल गेट्स 65 वर्षांचे झाले आहे आणि त्यांनी अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये जमीन खरेदी केली आहे. बिल यांनी अर्कंससमध्ये 45 हजार एकर आणि एरिजोनामध्ये 25 हजार एकर शेतीची जमीन खरेदी केली आहे. 2018 मध्ये त्यांनी वॉशिंग्टनमध्ये 16 हजार एकर जमीन खरेदी केली होती. वॉशिंग्टनमध्ये खरेदी केलेल्या जमिनीतून 14.5 हजार एकर जमीन हॉर्स हॅवेन हिल्समध्ये खरेदी केली होती. या जमिनीसाठी त्यांना तब्बल 1251 कोटी रुपये द्यावे लागले. 2018 मध्ये खरेदी केलेली ही सर्वात महागडी जमीन आहे.

बिल गेट्स यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीचं कारण सांगितलं नाही. कास्केड इव्हेस्टमेंट कंपनीनेदेखील बिल गेट्सद्वारा जमीन खरेदी बाबत अधिक माहिती दिली नाही. कंपनी सस्टेनबेल फॉर्मिंगसाठी बरीच मदत करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने 2008 मध्ये केलेल्या घोषणेनुसार आफ्रिका आणि जगातील अन्य विकसनशील भागात छोट्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मदत करेल. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2238 कोटी रुपयांची मदत देत आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *