इतर काम-धंदा बातमी ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा वायरल झालं जी शेती

पुण्यातील मायलेकींचा १४० देशात डंका, गुलाबाच्या फुलापासून WINE बनवण्याचा आहे व्यवसाय…

वाईन म्हटलं की सगळ्यांनाच द्राक्षांचीच माहिती असते. पण आता चक्क गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेली वाईन तुम्हाला प्यायला मिळणार आहे. हा नवीन प्रयोग केलाय पुण्याच्या जयश्री यादव व त्याच्याशी कन्या कश्मिरा यादव-भोसले यांनी.

वाईनची आवड असणाऱ्यांना गुलाबाची वाईन म्हणजे नवी अस्वादाची मेजवानीच म्हणावी लागेल. या यादव मायलेकींनी गुलाबाच्या फुलापासून वाईन निर्मिती करायला सुरुवात केली व त्याचे पेटंट ही आपल्या नवे करून घेतले. भारताबरोबरच जवळ जवळ 140 देशांमध्ये गुलाबाच्या वाईंची पेटंट स्वतःच्या नवे लॉक करून घेतले आहे. आणि या मुळेच त्या फुलांपासून वाईन बनवणाऱ्या पहिल्या वाहिल्या उद्योजिका ठरल्या.

तसे त्यांनी गुलाबापासून वाईन तयार करण्याचा प्रारंभ साल 2008 मध्ये चालू केला होता. हे प्रयोग त्यांनी सुरुवातीला बऱ्याच वेळा घरीच करून पहिले. तास त्याचा सरबत, गुलकंद , गुलाबपाणी बनवण्याचा आणि विकण्याचा उद्योग आहे. पण गुलकाब्द बनवताना त्यांना त्याच गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईन ही बनवता येते का हे पहिले. तर हा प्रयोग उत्तमरीत्या यशस्वी सुद्धा झाला. त्यांना गुलाबापासून वाईन बनवता येऊ लागली. तेव्हा त्यांनी वाईन च्या व्यवसायाचा विचार केला. व या प्रयोगासाठी पेटंट मिळावे तासाठी देखील धडपड चालू केली. या यशस्वी झालेल्या प्रयोगाला कायद्याने हि परवानगी मिल्ने आवश्यक होते कारण या आधी कधीच गुलाबाची वाईन अजून तरी कोणी विकलेली नव्हती.

मग त्यासाठी त्यांनी या बद्दल माहिती काढली तर राज्यात फुलांपासून वाईन तयार करण्याचा कोणताही कायदा उत्पादन शुल्काच्या नियमालीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांच्याकडून या बद्दल माहिती काढली. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर कायद्यात सुधारणा करुन गुलाबापासून वाईन निर्मिती करण्याची यादव यांना परवानगी मिळाली.

जवळजवळ दोन दशकांपासून सरबत, गुलकंद, गुलाबपाणी उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या जयश्री यादव या पन्नास शंभर किलोचा गुलकंद विकायच्या आता त्यांच्या व्यवसाने टना पर्यंत ची मजल मारली आहे. ही यशस्वी घोडदोड सुरु होईच्या आधी त्या शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेत पण नंतर त्यांनी स्वतःची गुलाब उत्पादन करण्यासाठी बाग च फुलवली. या गुलकंदाच्या व्यवसआवरच न थांबता त्यांनी गुलाबाचा वाईच्या संशोधनास सुरुवात केली व त्यात त्यांना यश ही लाभले.

जयश्री यादव ही यशस्वी उद्योजिका आज चाकणच्या एम आय डिसी मध्ये आधूनिक अशी रिफायनरी देखील उघडण्याच्या तयारीत आहे. या रिफायनरी मध्ये पाच हजार लिटर व एक हजार लिटर क्षमतेच्या तीन-तीन टाक्या अशा एकूण अठरा हजार लिटर रोझ वाईन दर चार महिन्याला तयार होणार आहे. यासाठी लागणाऱ्या बाटल्या इटली येथून मागवल्या जाणार आहेत.

हे सगळं करताना त्या नेहमी म्हणतात की, आज जे काही मी करू शकले ते फक्त माझ्या आई वडिलांनी दिलेल्या शिक्षण मूळे. त्यांनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग मी आज या मोठ्या उद्योगात करू शकले. त्यांना दोन मुली असून त्यांची छोटी मुलगी त्यांना या व्यवसायात मदत करते तर मोठी मुलगी ही ऑस्ट्रेलिया ला असते. या सगळ्यात माझ्या घरच्यांचा खूप मोठा वाट असल्याचे त्या सांगतात.

घरच्यांबरोबर त्यांना आमदार दिलीप मोहिते-पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील खूप सहकार्य केले असल्याचे जयश्री यादव म्हणतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *