इतर महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी व्हिडिओ

फ्लाईंग डोसा : येथे डोसा हवेत फिरवून मग डिश मध्ये येतो…

मुंबई मधील एका डोसा विक्रेत्यांचा व्हिडिओ सध्या फेसबुक वर चांगलाच वायरल होतोय. हा डोसा विक्रेता त्याच्या अनोख्या डोसा बनवण्याच्या पद्धतीमुळे फेमस होत आहे. त्याच्या व्हिडिओला एकूण ८४ मिलियन्स च्या पुढे ही व्हूवज् (view) मिळाले आहेत. दक्षिण मुंबईच्या मंगलदास मार्केटमधील श्री बालाजी डोसा येथे डोसा थेट तव्यावरून उडत प्लेटवर जातो.

‘स्ट्रीट फूड रेसिपी’ नावाच्या एका फेसबुक पेजने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. डोसा विक्रेत्याचे डोसा विकण्याचे हे या कौशल्य पाहून सगळेच अवाक होत आहेत. तो ज्या कुशलतेने डोसा तयार करीत आणि हवेत उंच फडफडवत उडवतो हे व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी रोमांचित ठरत आहेत. तो डोसा अशा काही पध्दतीने फिरवतो की जेणेकरून डोसा प्रत्यक्ष प्लेटवरच उतरतो. हा त्याचा स्टंट इतका सुलभतेने करतो की पाहणारे आश्चर्यचकित होतात.

  1. “सर्व्हिंग डोसा लाईक ए बॉस,” लिहीत हा व्हिडिओ फेसबुक पेजने शेअर केला आहे.
    गेल्या आठवड्यात फेसबुकवर पोस्ट केल्यापासून, व्हिडिओने हजारो प्रभावित कमेंटसह तब्बल ८४.४ मिलियन्सहून अधिक व्हूवज आणि १.३ मिलियन्सहून अधिक लाईकस् मिळवले आहेत. या स्टंटला आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगचा नवा मार्ग म्हणून पाहिले गेले आहे. आजकाल व्यवसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आइडिया काढताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *