बातमी मनोरंजन

या एका कारणांसाठी सैफ आणि अमृता यांनी मोडला होता तब्बल 13 वर्षांचा संसार…

सैफ अली खान आणि करीना कपूर यांना नुकतेच दुसरे अपत्य झाले. सैफ आणि करीना नेहमी चर्चेत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का ? सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंह हिच्याशी झाले होते. सैफ आणि अमृता यांचा 13 वर्षांचा सुखी संसार होता पण असे काय झाले की सैफ आणि अमृता यांना वेगळे व्हावे लागले. आजच्या या लेखात आपण अमृता आणि सैफ यांचा घटस्फोट का झाला यामागील कारण जाणून घेणार आहोत . सैफ आणि अमृता यांना दोन अपत्ये आहेत. एक सारा आणि दुसरे अब्राहम. सारा ही बॉलीवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

अमृता जेव्हा बॉलीवुडमध्ये आघाडीची अभिनेत्री होती तेव्हा तिचे आणि सैफचे अफेअर सुरू झाले. अमृता सैफ पेक्षा तब्बल 12 वर्षानी मोठी आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. 1991 मध्ये सैफ आणि अमृता यांचा विवाह झाला आणि 2004 मध्ये ते दोघे विभक्त झाले.

सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सैफचे विवाह बाह्य संबंध होय. सैफचे अनेक अभिनेत्री सोबत नाव जोडले जात होते आणि हेच अमृता यांना आवडत नसायचे,त्यामुळे अमृता आणि सैफ यांच्यामध्ये खूप वाद होतं असतं शेवटी या दोघांनी वेगळे होण्याचे ठरविले. अमृता यांनी सैफ अली खान यांना तब्बल 5 कोटी इतकी पोटगी मागितली त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वाद झाले.

असे देखील म्हटले जाते की सैफने अमृता यांना दोन टप्प्यांमध्ये पोटगीचे पैसे दिले होते. घटस्फोट झाल्यानंतर कित्येक दिवस सैफ आपल्या मुलांना भेटू शकत नव्हता कारण अमृता यांच्याकडे मुलांचा ताबा होता. 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीना आणि सैफ अली खान यांनी विवाह केला. तैमुर हा सैफ आणि करीना यांचा मुलगा आहे तर नुकतेच त्यांना दुसरे अपत्य देखील झाले आहे. त्याचे नाव अजून ठरविले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *