काम-धंदा बातमी यशोगाथा वायरल झालं जी

पैसे नसल्यामुळे शाळा सोडून कंपनीमध्ये कामला लागलेला गौतम बनला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती..

काही स्वप्न ही आपल्या नजरेपालिकडची असतात. जेव्हा ती स्वप्न पूर्ण होतात तेव्हा एक प्रश्न सहज पडतो तो म्हणजे की मी हे स्वप्न पाहिलंच नव्हत किंवा असं स्वप्न पाहण्याची कल्पना देखील केली नव्हती. असचं काही गौतम अदाणी यांना वाटलं असेल. गुजरात सारख्या राज्यातील एक सर्व सामान्य घरातील मुलगा जेव्हा भारतातीलचं काय जगातील मोठं असलेलं मुंबई एअर पोर्ट चालवन्यामध्ये भागीदारी करतो  तेव्हा सर्व जगाच्या नजरा या व्यक्तीकडे वळतात. हा व्यक्ति दूसरा तिसरा कोणी नसून भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अडाणी ग्रुपचे मालक गौतम अदाणी हे आहेत. आज आपण गौतम अडाणी यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

गौतम अदाणी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरात येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल हे होते तर त्याच्या आईचे नाव शांती असे होते. गौतम यांना एकूण 7 भावंडे होती. त्यांचे वडील कपड्यांचे व्यापारी होते. घरातील आर्थिक स्थिती ही सर्वसामान्य होती. बी. कॉमसाठी गौतम यांनी प्रवेश घेतला पण आर्थिक स्थितिमुळे त्यांना दुसऱ्या वर्षातून शिक्षण सोडावे लागले. काही दिवस वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले पण त्यांचे मन त्यामध्ये रमले नाही. त्यांची स्वप्न काही वेगळीचं होती. त्यांनी त्यांच्या स्वप्नंनासाठी मुंबई गाठण्याचे ठरविले.

मुंबई येऊन त्यांनी महेंद्र ब्रदर्स येथे डायमंड सॉरटर्स म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी येथे चार वर्ष अनुभव घेतला आणि त्या नंतर स्वताची डायमंड ब्रोकर फर्म सुरू केली. त्यावेळी त्यांनी स्वप्न पाहिले की त्यांना मार्केट मधील सर्वात मोठा डायमंडचे व्यापारी व्हायचे आहे. या काळातचं गौतम यांचे थोरले बंधु मनसुख भाई यांनी अहमदाबाद येथे छोटे प्लॅस्टिक युनिट सुरू केले होते. त्यांनी गौतम यांना पुन्हा बोलावून घेतले. 1985 मध्ये पॉली फिनाईल युनिटमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. अदानी एक्सपोर्ट लिमिटेडची स्थापना केली. 1991 साली आलेल्या खुल्या व्यापारी धोरणामुळे अदानी यांना खूप फायदा झाला.

त्यांनी मेटल , कपडा , प्लॅस्टिक सर्व व्यवसायात खूप प्रगती केली. 1994 साली गुजरात सरकारने मुद्रा पोर्ट हा खाजगी पोर्ट उभा करण्याचे टेंडर काढले आणि हा प्रोजेक्ट अदानी ग्रुपला मिळाला. ही त्याच्या व्यवसायातील सर्वात मोठी झेप ठरली. 1996 साली वीज निर्मिती क्षेत्रात देखील त्यांनी झेप घेतली आणि तेथे देखील त्यांना खूप यश मिळाले. त्या नंतर थर्मल पॉवर क्षेत्रात देखील त्यांनी एक वेगळीच ऊंची गाठली.

आज मितीला त्याच्याकडे 4620 मेगा वॉट इतकी मोठी वीजनिर्मिती करण्याची क्षमता असलेला प्लॉट आहे. 2009 साली त्यांनी एक वेगळीच झेप घेतली अब्बोट पॉवर पोर्ट आणि कर्मिकल कोल या दोन्ही कंपनी विकत घेतल्या. हे सर्व होत असताना गौतम यांच्यावर अनेकदा टीका झाल्या पण गौतम काही थांबले नाहीत. त्यांनी त्याची प्रगती सुरूच ठेवली. आज मितीला गौतम हे भारतातीलच नव्हे तर जगातील एक श्रीमंत व्यक्ति आहेत. ते सेल्फ मेड आहेत. मुंबई विमानतळातील 74 % टक्के भागीदारी ही सध्या अडाणी ग्रुपकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *