ताज्या बातम्याराजकीय

असा होता मनोहर पर्रिकर यांचा संघर्षमयी प्रवास…

11.1Kviews

गोवा – माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. याच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने पर्रिकरांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. कर्करोगाशी त्यांची लढाई अखेर अपयशी ठरली. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व अशी पर्रिकरांची ओळख होती.

त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला होता. पर्रीकरांना झोपुन राहण्यास सांगण्यात आलो होते. मागील पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. पण शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरू झाले. गेल्या, कित्येक दिवसांपासून पर्रीकरांची सुरू असलेली मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोककळा पसरली आहे.

 

मनोहर पर्रिकरांचा प्रवास

13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

 

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.

मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारणात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. पण, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले, आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Response