पुणे बातमी ब्लॉग महाराष्ट्र राजकारण

आणि म्हणून आमदार साहेबानी कार्यकर्त्यांना भेट दिल्या चांदीच्या चपला आणि मोटारसायकल गाड्या…

राजकारणात सगळ्याच नेत्यांचा एक चाहता वर्ग असतो जो त्यांच्यखसाठी कोणते कार्य करण्याची नेहमीच तयारी दाखवतो. यांनाच आपण ‘कार्यकर्ते’ म्हणतो. आपल्या नेत्यावर असलेली निष्ठा, त्यांच्यावरचा विश्वास हा या कार्यकर्तांमध्ये सळसळून वाहत असतो. नेते ही आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रोत्साहित करत असतात. याचेच एक उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

भाजपचे आमदार असणारे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते. ते २०२० मध्ये भाजपसह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आले. सध्या त्यांनी केलेल्या एका कार्यामुळे ते अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे झाले असे की, गोपीचंद पडळकरांनी आमदार व्हावेत म्हणून त्यांच्या काही कार्यकरत्यांनी पण घेतले होते.

नारायण पुजारी, दत्तात्रय कटरे आणि दिवंगत जालिंदर क्षीरसागर पायात चप्पल घालणार नाही असा पण केला होता, तसेच अमरसिंह देशमुख यांनी फेटा घालणार नाही असा पण केला होता, म्हणून पडळकर या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आटपाडी तालुक्यातील झरे येथे आयोजित केला होता.

पडळकरांनी पण करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांना चांदीची चप्पल व दुचाकी देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच सलून व्यासायिक असलेले दिवंगत जालिंदर क्षीरसागर यांनी पडळकर आमदार होत नाहीत तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही असं ठरवलं होतं. त्यांच्या मागे त्यांच्या घरच्यांना देखील दुचाकी पडळकरांनी दिली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, साताऱ्याच्या माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होते.

मनाला स्पर्श करून जाईल असा हा सत्कार सभारंभ झाला. आपल्या नेत्यासाठी ‘पण’ ठेवणारा कार्यकर्ता आणि आपल्या कार्यटर्त्यासाठी झटणारा नेता या सन्मान सोहळ्यामुळे पाहायला मिळाला. तिथे उपस्थित असणाऱ्यांचे आणि ही बातमी ऐकणाऱ्यांचे, वाचणाऱ्याचे देखील डोळे आपसूकच पाणावले असतील हे नक्की !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *