तब्येत पाणी

एसीमुळे वाढतोय कोरोनाचा धोका; सावध राहा

देशात उकाडा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जरा गरम झालं की आपण एसीचा वापर करतो. आणि आता सध्या कोरोनामुळे घरातूनच काम करायला सांगितले आहे. अशावेळी आपण एसीचा दिवसभर वापर करतो. मात्र एसीमुळेही कोरोनाचा धोका वाढू शकतो त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्टुयट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, ‘गरमीमुळे कोरोनाव्हायरस निष्क्रिय होईल, याचे काही पुरावे नाहीत. मात्र गरमी वाढते, तशी लोकं एसीचा वापर जास्त करतात. यामुळे घरातील तापमान कमी होतं आणि घरात आधीपासूनच असलेला व्हायरस पुन्हा सक्रिय होतो. असं वातावरण व्हायरससाठी अनुकूल होतं कारण एसी सुरू असल्यावर आपण घरातील वेंटिलेशनचे सर्व मार्ग बंद करतो, ज्यामुळे हवा खेळती राहत नाही. घरात दमटपणा वाढतो’

तज्ज्ञांच्या मते, थंड ठिकाणी व्हायरस तग धरू कतो. यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झपाट्याने परू शकतो. ज्या घरात वेंटिलेशनची व्यवस्था चांगली नाही, ती जागा व्हायरससाठी सर्वात चांगली ठरते.