तब्येत पाणी

तुम्हाला भीतीदायक स्वप्ने पडतात का? मग हे नक्की वाचा!

अनेकजण भीतीदायक स्वप्न पडल्याने घाबरुन उठतात. अश्या समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतात. ही समस्या कधीतरी होणे सामान्य आहे पण वारंवार होत असेल तर हे गंभीर आहे. या आजारास नाइटमेयर डिसऑर्डर असे म्हटले जाते. हा एक मानसिक आजार आहे.

काय करणे असू शकतात?

स्लीप अ‍ॅनिमिया, झोप पूर्ण न घेणे, भीतीदायक चित्रपट पहाणे, कांदबरी, पुस्तके आदी पुन्हा-पुन्हा पाहणे किंवा वाचणे, जीवनात काही अनिष्ट घटना घडणे, कायम तणावात राहणे किंवा डिप्रेशनमध्ये राहणे. मद्यसेवन व धूम्रपानची सवय असणे.

हे आवश्य करा

एक आठवड्यापेक्षा जास्त किंवा सतत भीतीदायक स्वप्ने येत असतील तर डॉक्टर पॉलिसोम्नोग्राफी टेस्ट करतात. झोपेदरम्यान शरीरात होणारे बदलांवर लक्ष ठेवले जाते. उपचारात अ‍ॅँटीडिप्रेशन औषध दिले जाते. नशेच्या पदार्थांपासून परावृत्त केले जाते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ही समस्या होऊ शकते. भितीदायक स्वप्नांमुळे झोपमोड होते. भीती, ह्रदयाचे ठोके वेगवान होणे आणि लांब-लांब श्वास अशा समस्या होतात.