तब्येत पाणी

रात्री झोप येत नसेल तर या पदार्थांचे सेवन करा

आज काल अनेकांची समस्या झाली आहे ती म्हणजे रात्री झोप न येणे. त्यामुळे आज आम्ही रात्री झोप येण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायचे याची माहिती देणार आहोत.

अक्रोडमध्ये मेलाटोनिन आणि हेल्दी फॅट असतं, ज्यामुळे चांगली झोप लागते.

दुधात ट्रायप्टोफॅन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि मेलाटोनिन असे घटक असतात, जे झोपेला चालना देतात. रात्री झोपण्यापूर्वी विशेषतः कोमट दूध प्यायला हवं.

किवी मध्ये सेरोटोनिन आणि अँटिऑक्सिडंट असतात, हे दोन्ही घटक झोपेची गुणवत्ता सुधारतात.

रात्री झोपण्यापूर्वी बदाम खावे. बदामामध्ये झोपेला प्रोत्साहन देणारं मॅग्नशिअमही असतं. त्यामुळे झोप चांगली येते.