तब्येत पाणी

झोप आणि भूकेची समस्या असेल तर नियमित ‘ही’ भाजी खा

तुम्हाला जर रात्रीची झोप येत नसेल किंवा भूक लागण्याची समस्या उद्भवत असेल तर वांग्याची भाजी खाणं फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊयात वांग खाण्याचे फायदे

वांगे हे अग्निदीपक आहे. त्यामुळे अन्न पचतं आणि भूक चांगली लागते.कोवळे डोरली वांगे विस्तवावर भाजून घ्यावं. जळलेली साल काढून टाकून द्या. आता वांग्यात मिरपूड आणि चवीपुरते सैंधव घालून खा.

वांगे हे निद्राकारा म्हणजे झोप आणणारे आहे.वरीलप्रमाणे वांग्याचे भरीत खाऊन झोपल्यास झोप चांगली लागते. शिवाय वांग्याची पानंही झोपेसाठी उपयुक्त आहेत.वांग्याची पाने ठेचून त्याचा चमचाभर रस (१० ग्रॅम) घेऊन त्यात वाटीभर दूध (५० ग्रॅम) आणि खडीसाखर टाकून प्या. झोप चांगली लागेल.

अशक्तपणा वाटत असल्यास कोवळ्या वांग्याची भाजी खावी. वांगे शुक्रकर आहे. तेव्हा नियमित खाल्ल्यास थोड्याच दिवसात शक्ती वाढेल.