तब्येत पाणी

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या आहेत टीप्स

कोरोना व्हायरसचे थैमान संपूर्ण जगभरात पसरले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती जास्त पाहिजे असा सल्ला अनेक डॉक्टर देत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

तुम्ही अन्न जेवढे शिजवून खाताल तेवढी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनीही रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल

घरी आहात त्यामुळे रात्री जास्त वेळ जागे राहू नका. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा