तब्येत पाणी

नवरात्रीचा उपवास मधुमेहाच्या रुग्णांना भारी पडू नये म्हणून…

नवरात्री उद्यावर येऊन ठेपली आहे. अनेकांच्या घरी या नऊ दिवसांची तयारीही झाली असेल. गरबा खेळण्यासाठी कपडे, प्रसादाचे साहित्य, उपवासासाठी लागणारी सामग्री अशा सर्व गोष्टींची पूर्तता करताना आरोग्य मात्र विसरता कामा नये. नऊ दिवस उपवास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मधुमेह असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.

आपण टाइप 2 मधुमेह रुग्ण आहात तर आणि नवरात्रीचा उपास ठेवू इच्छित असाल तर उपवास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवे आणि प्रोटीनचा पुरवठा असणे आवश्यक आहे. आपण या सर्व वस्तूंचा योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपवास करण्याची ताकद मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. तसेच उपवास ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही महत्वाचा आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी मिठाशिवाय अजिबात उपवास ठेवू नका. तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इंसुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. उपवास दरम्यान आपली शुगर लेवल तपासत राहा. खाण्यात जास्त अंतर राहणार नाही याची आवर्जून काळजी घ्या.