तब्येत पाणी

सतत ‘नेलपेंट’चा वापर केल्यास ‘या’ समस्या होऊ शकतात

अलिकडे नेलपेंटमध्ये सुद्धा विविध आकर्षक प्रकार आल्याने याचा वापर वाढला आहे. बहुतांश मुली हातांचे सौंदर्य खुलविण्यासाठी नेलपेंटचा वापर करतात. परंतु, सतत नेल पेंटचा वापर केल्यास नखांसाठी ते अपायकारक ठरु शकते. अलिकडे नेलपेंटमध्ये सुद्धा विविध आकर्षक प्रकार आल्याने याचा वापर वाढला आहे. नेलपेंटमुळे नखे तात्पुरती सुंदर आणि आकर्षक दिसत असली तरी काही दिवसांनी मोठे नुकसान होऊ शकते. नखांची वाढ खुंटणे, पातळ होऊन तुटणे, अशा समस्या होऊ शकतात.

का आहे अपायकारक
नेलपेंट रिमूव्हरमधील अ‍ॅसिटोनमुळे नखांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा शोषला जातो. नखांच्या भोवतालची त्वचा कोरडी पडते. नखे शुष्क होतात. नेलपेंट घासून काढल्याने नखावरील पातळ थर निघून जातो. नखे कमजोर होऊन तुटतात. बेस कोटशिवाय नेलपेंट लावल्यामुळे नखे पिवळी पडतात.

हे लक्षात ठेवा
नेहमी बेस कोट लावूनच नेलपेंट लावा. कधीही स्वस्त आणि केमिकलयुक्त नेलपेंट वापर करु नका. विटामिन नेलपेंट वापरल्याने नखांना पोषण मिळेल. नखांना आरामही द्यायला हवा. दिवसभरात १०-१५ मिनिट नखे गरम पाण्यात बुडवून ठेवा.