तब्येत पाणी

‘या’ चहाचे उन्हाळ्यात करा सेवन

उन्हाळ्याच्या दिवसात फक्त थंड शरीरात जावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र चहा पिण्याची सवय काही सुटत नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसात दुधाच्या चहाचे सेवन करणे घातक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हर्बल चहा शरीरासाठी कसा फायदेशीर आहे. हे सांगणार आहोत.

तुळसीचा चहा- तुलसीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुळसीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असते. तुळसीचा चहा बनवण्यासाठी एक पॅन मध्ये एक कप पाणी घ्या आणि ते चांगले उकळेपर्यंत गरम करा. चहाला उकळी आल्यावर पॅनचे झाकन काढून त्यात ६-७ तुलसीची पाने व्यवस्थित धुऊन घाला. 2 मिनिटे झाकून ठेवून नंतर चहा गाळून प्या. त्यामध्ये अर्ध्या चमचा लिंबाचे रस आणि एक चमचा मध घाला. हा चहा आपल्या पोट, डोळे, यकृत, लिव्हर आणि हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.