इतिहास ब्लॉग विदेश

स्वतःला श्रीरामांचा अवतार मानणाऱ्या थायलंडच्या राजाने थायलंडमध्ये वसवली ‘अयोध्या नगरी’….

श्रीरामाची जन्मभूमी असणारी पवित्र पावन अयोध्या नगरी ही भारतीयांसा एक महत्वाच धार्मिक स्थान आहे. अशीच रामाची अयोध्या अजून एक आहे अस जर तुम्हाला सांगितलं तर?… पण ती येथे भारतात नव्हे तर ती आहे थायलंड मध्ये…भारतापासून सुमारे बऱ्याच अंतरावर असणारा हा थायलंड देश ही स्वतःला रामभूमी म्हणतो.

हो! हे खरे आहे. थायलंड मधील प्रमुख राज्यकर्ते असणारे राजवंशज स्वतःला श्री प्रभू रामचंद्राचे वंशज मानतात.
थायलंड मध्ये बरीच वर्षे ‘चक्री’ या घराण्याचे राज्य आहे. त्यांच्या तब्बल १० पिढ्यापासूनचे राजे – महाराज स्वतःच्या नावाला राम लावतात. १० पिढ्या मागे म्हणजे ही काही आत्ता आत्ता ची गोष्ट नक्कीच नाही. याला आता बराच काळ लोटला जेव्हा पासून ते राजवंशज स्वतःला श्रीरामाचे वंशज मानतात. तेथे होणाऱ्या प्रत्येक राजाच्या नावात ‘राम’ हे असतच. त्या राम नावाच्या नंतर ते आकडे लावतात जसे की प्रथम, द्वितीय वगैरे.

सद्यस्थितील राजाचे नाव ‘राम X’ आहे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे झालेच तर ‘राम दशम’ हे नाव वर्तमानातील राजाचे आहे. त्याच्या नावावरून तो त्या ओळीतला दहावा राजा आहे हे कळून येतेच. अशा प्रकारेच आधीचे राजे ही ‘राम’ हे नामधारण करून ओळीत येणारा आकडा राम नामा पुढे लावीत.

तेथे थायलंड मध्ये राजाला खुप महत्व आहे. तेथील जनता राजाचा अवमान होईल असे कोणतेही कार्य करत नाही. तेथे राजाच्या नावाचा उच्चार ही एकेरी केला जात नाही.
या वंशातला वजिरावधु हा राजा त्यांच्या इतिहासात प्रसिध्द आहे. या राजाला ‘राम सहावा’ म्हणून ओळखले जाते…म्हणजेच ‘राम VI’. यानंतरचे राजे याच क्रमाने ‘राम VII’, ‘राम VIII’ इ. ओळखले गेले.
आज असलेला राजा ‘राम X’ हा तेथे ‘फुटबॉल प्रिन्स’ म्हणूनही प्रसिध्द आहे. तसेच या राजाचे मुख्य नाव ‘वजिरालोंगकॉर्न’ असे आहे. हा राजा २०१६ साली गादीवर आला व त्याने ‘राम X’ हे नामधारण केले. त्यानंतर २०१९ ला त्याचा खुप मोठ्ठा दिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याची संपत्ती २०२० मध्ये ४३ अब्ज डॉलर एवढी होती. त्यामुळे त्याची गणना सर्वात श्रीमंत शासकांमध्ये केली जाते.

रामाचे अस्तित्व मानणाऱ्या या देशात ‘अयुत्थया’ म्हणून हे नगरी वसलेली आहे. आपल्या श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येला जेवढे पवित्र स्थान आहे. तेवढेच महत्वाचे स्थान या नगरीला देखील थायलंड मध्ये आहे. विशेष म्हणजे थाई लोकांच्या मते, ‘अयूत्थया’ ही च रामायणातील अयोध्या आहे. या नगरीवर ‘स्याम’ राजघराणं १३५१ पासून राज्य करत आहे. येथे राजे स्वतःला ‘रामतिथीबोध’ ही उपाधी लावतात.

भारताचा सुवर्ण काळ मानला जाणारा श्रीरामाचा कालावधी हा भारतींयांच्या लोककलेत, लोकगीतांमध्ये सर्वोत्तम काळ मानला जातो. याचे सर्व वर्णन आपण रामायणात वाचतोच ‘रामायणा’ सारखाच श्रीरामाची यशोगाथा सांगणारा थायलंडचा सर्वात प्रसिद्ध धार्मिक ग्रंथ आहे. त्याचे नाव ‘रामकिन’ असे आहे. याला ‘थाई रामायण’ म्हणून देखील ओळखले जाते. या ग्रंथाचा प्रमुख खलनायक थोत्सकान ह्याची व्यक्तिरेखा देखील रावणाशी मिळती जुळती आहे. या ग्रंथाचा नायक फ्रान राम हा प्रभू श्रीरामाप्रमाणे एक पराक्रमी राजा आहे. १८ व्या शतकात राजा ‘राम I’ यांनी हा ग्रंथ पुनर्लिखित करुन घेतला होता.

थायलंड ही ‘रामायण’ या महापुराणातील अवशेषांची साक्ष देणारी भूमी आहे. येथील लोक आज ही हा ऐतिहासिक ठेवा जपत आहेत आणि हा वारसा अभिमानाने पुढे ही चालवत आहेत.
आपल्या इथल्या श्रीरामाच्या अस्तिवावर शंका घेणाऱ्या लोकांपेक्षा थायलंड मधील श्रीरामावर निष्ठा असणाऱ्या लोकांची संख्या कितीतर पटीने अधिक आहे.

श्रीरामाचे अस्तित्व आजही या भारतभूमी पासून दूरवर कोणीतरी जपून ठेवत आहे ही गोष्ट एक भारतीय म्हणून नक्कीच अभिमानास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *