इतिहास

‘शक्तिमान’ मालिका हिट असतानाही बंद का करावी लागली? १४ वर्षांनंतर उघडले गुपीत

शक्तिमान’ म्हटलं की ९० च्या दशकातल्या किड्स असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर बालपणीच्या आठवणी येतात.

आज शक्तिमान बद्दल लिहण्याचे कारण की, लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’च्या दुसऱ्या सीझनची सध्या चर्चा सुरू असून लवकरच दुसरा सीझन टीव्हीवर येऊ शकतो. शक्तिमानची भूमिका करणाऱ्या मुकेश खन्ना यांनी या मालिकेबाबत काही गुपित गोष्टी उघडपणे समोर आणले आहेत. तसेच शक्तिमान मालिका लोकप्रिय असताना बंद का करावी लागली याचे कारण देखील सांगितले.

मुकेश खन्ना म्हणाले की, दूरदर्शनवर ‘शक्तिमान’ सुरुवातीला नॉन प्राइम टाइम असतानाही म्हणजेच शनिवारी सकाळी आणि मंगळवारी सायंकाळी प्रसारित करण्यात येत होता. तरीही मालिका लोकप्रिय झाली होती. नॉन प्राइम टाइमसाठी दूरदर्शनला ३.८० लाख रुपये द्यावे लागत होते. त्यावेळी मालिकेचा शो प्रायोजित असायचे आणि जाहिरीतीतून कमाई होत होती.

अशा पद्धतीने शक्तीमानचे सुमारे १०० ते १५० एपिसोड सुरु होते. शक्तीमानची लोकप्रियता वाढताना पाहून दूरदर्शनने मला सांगितले की शक्तीमान रविवारीही प्रसारित करण्यात येईल. रविवारी मुलांना सुट्टी असते, त्यामुळे शक्तीमान मालिकेसाठी ही चांगली गोष्ट होती.

रविवारी शक्तीमान प्रसारित करण्याचे सुरु झाल्यानंतर मला एका एपिसोडसाठी दूरदर्शनला ७.८० लाख रुपये द्यावे लागत होते. रक्कम वाढविल्यानंतरही मी शक्तिमानचे १०४ एपिसोड केले, एपिसोड वाढल्याने फी दीड पट केली मला १०.८० लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. हा सर्व प्रकार पाहून मी सांगितले की, हे यशाचे वाईट परिणाम आहेत.

अचानक ३ लाखांवरून १० लाख फी देणे ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती. ज्यावेळी मला समजले की हे चॅनेलवाले एका एपिसोडचे हे १६ लाख रुपये करणार आहेत. मी याचा विरोध केला. तरीही त्यांनी माझे म्हणणे ऐकले नाही, शक्तिमानची लोकप्रियता वाढलेली असतानाही त्यांच्या फी वाढीमुळे मला नुकसान होत होते.

मुकेश खन्ना यांच्या नुसार त्यांना शक्तिमान मालिका बंद करायची नव्हती, पण त्यांना नाईलाजाने बंद करावे लागले. शक्तिमान बंद होण्याबाबत असे म्हटले जायचे की या शोमुळे लहान मुलं गच्चीवरून पडत आहेत, पण असे काहीच त्यावेळी होत नव्हते.

मुकेश खन्ना म्हणाले की, आजही लोक मला विचारतात की, शक्तीमान २ कधी आणत आहात. या गोष्टीची मी देखील वाट पाहत आहे. मला आशा आहे की आपण पुन्हा लवकरच भेटू. शक्तीमान सुमारे आठ वर्ष दूरदर्शन आणि लहान मुलांच्या मनावर राज्य करत होता.