इतिहास

मुला-मुलींच्या लग्नांचे वय वेगळे का असते?

नवी दिल्ली : भारतात बाल विवाह करण्यास बंदी असली तरी देखील अनेक ठिकणी बाल विवाहाच्या घटना घडत असतात. भारतात लग्नासंबंधी पहिल्यांदा ब्रिटिशांची सत्ता असताना कायदा करण्यात आला होता. या कयद्यात वेळेनुसार बदल करत २१ आणि १८ हे वय निश्चित कण्यात आले.

सर्वोच न्यायालयातील वकील प्रज्ञा पारिजात सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भारतात कायद्यानुसार तीन प्रकार आहे. पहिले वॉइड मॅरिज म्हणजेच शून्य विवाह. यात लग्न पूर्णपणे अमान्य असते. बालविवाह यातच येतात. दुसरे मान्य विवाह – कायद्यानुसार पूर्ण मान्यता असलेले हे लग्न असते. तिसरे म्हणजे अमान्यकरणीय विवाह – यामध्ये शून्य विवाह प्रकार असतो, मात्र न्यायालय परिस्थितीनुसार या विवाहाला मान्य ठरवते.

असा आहे इतिहास                                                                                                १८६० मध्ये इंडियन पीनल कोडनुसार १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा होतो. मात्र लग्नावर प्रतिबंध नव्हते. १९२७ मध्ये एज ऑफ कंसेट बिल आणण्यात आले. यात १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींबरोबर लग्न करणे प्रतिबंध होते. १९२९ मध्ये पहिल्यांदा लग्नाच्या वयासंबंधी कायदा कण्यात आला. बालविवाह विरोधी कायदा १९२९ नुसार, लग्नासाठी मुलाचे वय
१८ वर्षे आणि मुलीचे १६ वर्षे निश्चित कण्यात आले.

मात्र मुस्लिम समाजाने या कायद्याचा विरोध केला. मुस्लिम मुली मासिक धर्म सुरू झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार लग्न करू शकतात, दिल्ली उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये १५ वर्षांच्या मुलीचे स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलेल्या लग्नावर निर्णय देताना म्हटले होते की, इस्लामिक कायद्यानुसार, मुली मासिक धर्म सुरू झाल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे लग्न करू शकतात.

१९५५ मध्ये नवीन हिंदू विवाह कायदा बनवण्यात आला. हा कायदा हिंदूबरोबर जैन, बौध्द आणि शिख समुदायाला देखील लागू होतो. २०१२ मध्ये शिख समुदायासाठी वेगळा कायदा बनवण्यात आला. हिंदू विवाह कायद्यानुसार, लग्नासाठी मुलाचे वय कमीत कमी १८ आणि मुलीचे १५ वर्षे
असणे गरजेचे होते.

१९७८ मध्ये या कयद्यात संशोधन करण्यात आले. त्यानुसार, लग्नासाठी मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ असणे गरजेचे आहे. हा कायदा सर्व धर्मासाठी लागू होतो. अश्विनी उपाध्याय यांनी सर्व धर्मामधील मुलगा आणि मुली दोघांच्या लग्नासाठी कमीत कमी वय हे २१ असावे, अशी याचिका दाखल केलीआहे. लग्नाच्या वयासंबंधी मुद्दा याआधी देखील भारतात अनेकदा विवादाचे कारण ठरले आहे. २०१८ मध्ये लॉ कमिशने देखील मुला-मुलीच्या वयातील अंतर हे रूढीवादी असल्याचे म्हटले होते. याचे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. उपाध्याय यांच्या याचिकेवर ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.