बातमी मराठवाडा महाराष्ट्र राजकारण

बीडमध्ये एकच खळबळ,आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल

आमदार सुरेश धस यांना जबर धक्का बसला आहे.सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे.एका महिलेने धस यांच्या विरोधात ही तक्रार केली होती.त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.माधुरी मनोज चौधरी असे त्या महिलेचे नाव आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरोधात उभे राहिल्याचा राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्या हॉटेल आणि इतर स्थानिक संपत्तीची तोडफोड केली आहे.

आष्टी येथे स्थानिक पोलिसांत माधुरी यांनी गुन्हा दाखल केला आहे.या पूर्वी देखील वारंवार तक्रार करून देखील कोणतीच अॅक्शन न घेतली गेल्यामुळे माधुरी यांनी थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले होते. 19 जुलैच्या रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे पोहोचले आणि पीडित महिलेच्या संपत्तीची तोडफोड केली अशी तक्रार महिलेने केली आहे.

त्यानुसार, आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या होत्या, या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथून माधुरी चौधरी उभ्या राहिल्या होत्या.त्याचाच राग धस यांच्या मनात होता.माधुरी यांच्या पतीस देखील धस यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली आहे.तसेच खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *