क्रीडा बातमी विदेश

36 वर ऑलआउट ते २-१ ने विजय… याला म्हणतात बदला…

क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो आणि या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही, याच क्रिकेटच्या खेळात भारताने ऑस्ट्रलियाला त्यांच्या मायभूमीत चांगलीच धूळ चारली. भारत ऑस्ट्रलिया दौऱ्यावर जाण्याआधी सगळेच क्रिकेट विश्लेषक भारताला अंडरडॉग समजत होते. बऱ्याच जणांनी तर भारत टेस्ट मालिका ४-० ने हरणार असे भाकीत केले होते. ४-० तर सोडाच पण भारताने हि बॉर्डर-गावस्कर हि मालिका १-२ने खिश्यात घातली.

मालिकेमधील पहिला सामानाच्या दुसऱ्या डावात ३६ वर ऑल-आऊट झालेली भारतीय टीमचा आत्मविश्वास डावलेला असतानाच कॅप्टन विराट कोहली मायदेशी परतला. त्यानंतर टीमची मदार सांभाळली मराठमोळ्या अजिंक्य राहणेने. अजिंक्य राहणेने टीमची जवाबदारी सांभाळतच दुसऱ्या कसोटीतच आपल्या शतकीय पारीच्या भरवश्यावर भारताने पहिला विजय मिळवला. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विन आणि हनुमा विहारीच्या चिवट खेळीच्या भरवश्यावर भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवले..

आणि चौथ्या सामन्यात भारताने आपल्या पहिल्या सामन्याचा वचपा काढला. ३८ वर्ष अजिंक्य असलेल्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला भारताने 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.

तर युवा फलंदाज शुबमन गिलने ९१ धावांची खेळी करत चेतेश्वर पुजाऱ्याच्या साथीने डाव सांभाळला. त्यानंतर पडलेल्या विकेट्स मुळे भारत हरतो कि काय अश्या स्तिथीत असताना रिषभ पंत आणि सुंदर यांनी दमदार बॅटिंग करत भारताला विजयच्या शिखरावर पोहचवले. शेवटी १९ बॉल ३ रन्स पाहजे असताना विजयी चौकार मारत रिषभ पंत सहित भारतीय संघाने पहिल्या सामनाच्या वचपा काढला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *