इतर देश बातमी ब्लॉग राजकारण

भारत-चीन विवाद खरच निवळला का ही वादळा पूर्वीची शांतता?

काल राज्यसभेत बोलताना देशाचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार, सर्वात विवादित भाग असलेल्या पँगॉंग लेक परिसरावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली आहे आणि परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे. देशाच्या सीमेवरून चालेल्या या वादाला काहीतरी तोडगा निघावा असे वाटत असतानाच राजनाथ सिंह यांनी त्याबद्दलची माहिती राज्यसभेत दिली. या सीमाविवादा बद्दल सत्ता पक्षाने काहीतरी माहिती द्यावी असा जोरदार आग्रह विरोधी पक्ष करित होता. त्यानुसार संरक्षण मंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य विरोधकांना पचनी पडेलच असे नाही.

काय आहे हा वाद ?

सन १९६२ च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर चीनने ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधावर प्रभाव पडला. हाच वाद पुढे वाढत जाऊन आत्ता कुठे भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली.

समेट मध्ये मान्य केले गेलेले मुद्दे :

चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.
भारत आणि चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांचे सैन्य पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला ‘नो पेट्रोलिंक झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.

याचबरोबर देशाच्या अखंडतेबाबत कोणती ही तडजोड केली जाणार नाही. देशाच्या सीमा अबाधित राखण्याचे काम आपले सैनिक दल चोख पार पाडत आहे, असे राजनाथ सिंह ठामपणे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *