देश बातमी ब्लॉग विदेश

अभिमानास्पद…!! १५ देशांच्या सरकारमध्ये २०० भारतीय उच्चपदस्थ…

आता भारतीय आहेत १५ देशातील सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर…

वर्तमानात जगभर भारताची ख्याती अजूनच वाढत चाललेली दिसतेय. राजकारण, पर्यटन, जागतिक व्यवसाय, आर्थिक उलाढाली यामुळे जगात आपला देश नेहमी चर्चेत असतो. भारतीयांचे सगळ्या क्षेत्रातील यश हे अनेक देशातील वर्तमानपत्रांच्या बातमीचा विषय देखील असतो.
पण आजकाल खास चर्चेचा विषय होत आहे तो म्हणजे भारतीय वंशाचे लोक अनेक देशात विविध पदांवर बसली आहेत. आपल्या देशापासून, आपल्या मुळांपासून दूर असून ही आपल्या देशाचं नाव हे सगळे उंचावर न्हेवून ठेवण्याचं काम करीत आहेत.

भारतीय वंशाच्या व्यक्ती एक दोन नव्हे तर जवळ जवळ १५ देशांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. जसे की अमेरिका, ब्रिटन इ. या व्यक्तींमधील सुमारे ६० लोकं हे वेगवेगळ्या देशांच्या सरकारी हुद्द्या वर आहेत. या संपूर्ण लोकांची संख्या चालू काळात २०० आहे. इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स २०२१’च्या पहिल्या यादीत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. सरकारी वेबसाईट्स आणि सार्वजनिक रित्या उपलब्ध असणाऱ्या इतर माहितीनुसार ही यादी तयार केली.

आपल्या कष्टाच्या आणि कर्तृत्वच्या जोरावर आज भारतीय वंशाच्या लोकांनी विदेशात आपले स्थान भक्कम केले आहे. दुसऱ्या देशांत जाऊन त्या देशाच्या सरकार मध्ये महत्वाचे पद प्राप्त करणं ही काही सोप्पी गोष्ट नव्हे. एक भारतीय म्हणून हे यश आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *