आरोग्य

मासिक पाळी संपतांनाआई (रजो)निवृत्तीनिवृत्त होतेय.

451views

मासिक पाळी संपतांना
आई (रजो)निवृत्तीनिवृत्त होतेय.

-काल शेजारी 50 वर्षांच्या काकू आणि काकांमध्ये भांडण झालं;
हल्ली तू आधिकसारखं पटकन काम करत नाहीस,सारखी चिडचिड करते,असं छोटस भांडणाच कारण. आणि म्हणून मला या विषयावर आज लिहू वाटल-

 

नमस्कार
मी स्वप्निल छायाविलास चौधरी (BAMS student Pune)-9420257567

आज जरा वेगळ्या विषयावर या लेखाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलणार आहे,
विषय आहे

आई रजोनिवृत्त होते तेव्हा

साधारणतः स्त्रियांचं वय 47-52 या दरम्यान वयाच्या 12 13 व्या वर्षी सुरू झालेली आणि तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेली ही मासिक पाळी थांबते आणि तिच्या शरीरात आणि मनात प्रचंड उलथापालथ होते,शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर तिला लढावं लागतं,नेमकं हेच वय असत मुलगी लग्न होऊन सासरी जाते मुलाच लग्न होऊन नवीन सून घरात येते,आणि याच काळात राजोनिवृत्तीचा एक थोडासा क्लेशदायक काळ स्त्रीच्या आयुष्यात येतो,
-तिला लवकर थकवा येतो,
-कामाचा वेग पूर्वीसारखा राहत नाही,
-रात्री शांत झोप लागत नाही,
-आलीच तर पूर्ण शरीराला दरदरून घाम फुटतो,
-अशक्तपणा खूप वाढतो,
-काही स्त्रियांमध्ये वजन वाढतं,
-हाडांच्या तक्रारी डोकं वर काढतात,
-कानाजवळ मानेजवळ गरम वाफा येतात,
-स्तनांमध्येही दुखत,
पोटाचा फुगारा वाढतो.
हे झाले शारीरिक लक्षण
याचबरोबर मानसिक लक्षणेही
दिसू लागतात,
Mood swing होऊ लागतात,
आता चांगलं तर 5 मिनिटात ती चिडते,
-5 मिनिटांपूर्वीच्या गोष्टी तिला आठवत नाही,स्वयंपाक घरात तर हे हमखास घडतं एकदा मीठ टाकल्यावर कधी विसरुन ती पुन्हा टाकते आणि पुन्हा मग चिडचिड,
-कोणत्याच गोष्टीत या काळात रस वाटत नाही,
-समागमाची इच्छा नसते,
अशी प्रचंड मोठया प्रमाणात भावनिक गुंतागुंत तिची या काळात होत असते
अश्या वेळी सगळ्यात जास्त जबाबदारीनं आपलेपणानं आपण तिच्याशी मुलाच्या,मुलीच्या, नवऱ्याच्या भूमिकेतून आपण तिच्याशी खूप जबाबदारीनं आणि काळजीनं वागायला पाहिजे त्यासाठी हा लेखनप्रपंच,

आयुष्यभर आपल्याला जी सवलीसाखी साथ देते त्या नवऱ्यानं या काळात तिच्याशी सुसंवाद ठेवण सगळ्यात महत्वाच असतं
कारण तीनं तुमचा राग ,चिडन सगळं झेललेल असतं, तुमच्या आनंदात दुःखात ती पूर्णपणे सहभागी असते भागीदार असते,
आणि म्हणून या काळात तिला नवऱ्याची खूप गरज भासते,सगळ्यात जवळचा मित्र तोच असतो
अश्यावेळी त्यानं तिला सांभाळून घेतलं पाहिजे,
तिची ईच्छा नसतांना शरीर सम्बध ठेवू नये,
उलट तिला आधार दिला पाहिजे
तिच्या आवडत्या विषयांवर तिच्याशी बोललं पाहिजे

मुलांनी मुलींनीआईला या काळात कामात मदत केली पाहिजे
तिला जास्तीत जास्त विश्रांती कशी भेटेल,
तीच अस्वस्थ बैचेन मन कुठे रमू शकत हे पाहिलं पाहिजे
आणि सगळ्यात महत्ववाच म्हनजे तू एकटी नाहीयेस आम्ही तुझ्या सोबत आहोत ही भावना तिच्या मनात आपण निर्माण केली पाहिजे,
मुलगी असाल तर तुम्ही तिची सगळ्यात जास्त,
जवळची मैत्रीण असता ,आई अडाणी असेल तर मुलीनं तिला हे बदल कसे नैसर्गिक आहेत,हे समजून सांगितलं पाहिजे,
कामांत हातभार लावला पाहिजे
मोकळ्या गप्पा मारल्या पाहिजे
तिला कुठेतरी बाहेर फिरायला न्यायला हवं.

शेवटी ही एक नैसर्गिक प्रकिया आहे तो बदल शरीरात घडणारच आजची मासिक पाळी असणारी स्त्री उद्या राजोनिवृत्त होणारच अश्या वेळी स्त्रियांनीही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे,
जस की जर ती स्त्री नोकरी करत असेल
उदा.-शिक्षिका असेल तर इतर सहकार्यांनी तिला मदत करावी शक्यतो या काळात जास्त कामाचा ताण तिला देऊ नये,
घरी सून असेल तर सुनेनेही आपण आलो म्हणून ही आता कामात लक्ष देत नाही आरामच करते असे गैरसमज न करता समजून सहकार्य केले पाहिजे
शेवटी तिलाही या बदलांना सामोर जावंच लागणार आहे,

स्त्रीयांनी या काळात काय काळजी घ्यावी

आधी तर हा बदल नैसर्गिक आहे आणि तो हार्मोन्स बदलामुळे होतोच ही गोष्ट मनोमन स्वीकारली पाहिजे.

-काही स्त्रीयांना आपलं सौन्दर्य कमी होतंय अशीं भावना मनात येऊन मनात एक न्यूनगंड तयार होतो
ते टाळलं पाहिजे.

शक्य होईल आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेतली पाहिजे.

तुम्हाला काम केल्यावर थकवा येन हे स्वाभाविक आहे तेंव्हा
आधी मी इतकं काम करायचे म्हणून आताही तितकंच झालं पाहिजे हा अट्टहास सोडला पाहिजे,

-आपल्या आवडत्या छंदात मन रमवल तर शक्यतो एकटेपणा जास्त जाणवत नाही

नवऱ्याशी मुलांशी सुनेशी सुसंवाद ठेवून मोकल्यापनांण बोललं पाहिजे.

-शक्यतो हलका आहार घ्यावा,
सकाळी शक्य झाल्यास थोडं फिरायला जावं
आणि या काळात होणाऱ्या त्रासासाठी लगेच गोळ्या सुरू करू नका,
-जस की झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं
(यातून सवय लागून पुढे याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊन अनेक व्याधी उत्पन्न होतात)
त्याऐवजी योगा प्राणायम शिकून घ्या,

आणि आम्ही आज जे लेख मग मुलगा,मुलगी,सून,नवरा,
जावई, सासू अथवा यापैकी कुणी नसेल तर एक माणूसच्या भूमिकेतून वाचत असाल
तर एवढीच विनंती करतो की आपल्या नात्यात आई,काकू,बायको,सासू,जी कोणी स्त्री या रजोनिवृत्तीच्या काळात आपल्या सोबत असेल तर तिला समजून घ्या भावनिक आधार द्यावा,
शक्य होईल तेवढी मदत करावी
कारण स्त्री ही क्षणाची पत्नी बहीण मुलगी असली तरी ती अनंत काळापासून विश्वाची माता आहे,
आणि स्त्रियांच्या त्यागावर इतिहासाची दैदिप्यमान पाने उभी राहिलीत हेही एक निर्विदाद सत्य आहे..!!!
💲💲💲💲💲💲
आणि या काळात तिला समजून घेणं आमचं कर्तव्य आहे.

अपेक्षा करतो आपण अस वागू.
तुमचाच मित्र
स्वप्निल छायाविलास चौधरी
सोयगांवकर
9420257567
स्वप्नवत सोशल फौंडेशन महाराष्ट्र

Leave a Response