क्रीडाताज्या बातम्या

आयपीयल २०१९: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ होतोय नेटिझन्स कडून ट्रोल !!

780views

आयपीयल २०१९ च्या सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरे जाणाऱ्या विराट कोहली च्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला नेटिझन्स च्या ट्रोल चा सामना करावा लागत आहे.मिम्स द्वारे सोशल मीडिया वर आरसीबी ला ट्रोल केलं जात आहे.

IPL चा २०१९ चा हंगाम सुरुहुन आता खूप दिवस झाले असून आता पर्यंत प्रत्येक संघाचे पाच ते सहा सामने झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सोडून इतर सर्व संघाने एक तरी सामना जिंकला आहे. पण RCB ला एकही सामना जिंकता आला नाही. सलग सहा चे सहा सामने बंगलोर ने गमावले असून पॉईंट्स टेबल मध्ये सर्वात खालच्या स्थानावर ते आहेत. आता आयपीयल २०१९ मध्ये आपलं स्थान शेवट पर्यंत टिकवायचं असलं तर RCB ला इथून पुढचे सर्व सामने जिंकावे लागतील.

बंगलोर च्या ह्या खराब कामगिरी वर RCB चा सर्व चाहता वर्ग नाराज झालेला दिसतोय. सोशल मीडिया ला तर मिम्स, जोक्स आणि व्हिडिओस च्या माध्यमातून विराट कोहली आणि त्याच्या बंगलोर संघाला ट्रोल केलं जात आहे. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विटर वर हे सर्व मिम्स, जोक्स आणि व्हिडिओस वायरल होताना दिसत आहे.

ह्या सर्व ट्रोल्स वर इतर सर्व टीमचे फॅन्स कमेंट्स सेकशन मध्ये मज्जा घेत असल्याचं दिसत आहे.

Leave a Response