काम-धंदा बातमी महाराष्ट्र राजकारण

अलमट्टी धरणामुळे नव्हे तर या कारणामुळे कोल्हापूर सांगलीला महापूर आला -अजित पवार

कोल्हापूर,सांगलीला आलेला महापूर हा कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे येतो असं म्हटलं जातं, मात्र त्याचा अभ्यास करण्याबाबत एक समिति नेमण्यात आली होती,त्या समितीचा अहवाल मात्र वेगळंचं काही सांगतो, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.काल अजित पवार यांनी पूरग्रस्त जिल्हयांची पाहणी केली,त्यानंतर त्यांनी हा अहवाल सादर केला.एक गोष्ट नेहमी बोलली जाते,ती म्हणजे कोल्हापूर सांगलीला कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे पुर येतो,मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे.

धरणातील आवक- जावक याबाबत समन्वय ठेवला आहे.कर्नाटक प्रतिसाद दिला आहे.तसं कामं आजही सुरू आहे.मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो.त्यावेळेस सरकारने एक समिति नेमली होती.की खरोखर अलमट्टीमुळे पुर येतो का? या समितीने एक अहवाल सादर केला या अहवालात मात्र वेगळेच कारण सांगितले आहे. वरची जी काही धरणं आहेत, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत.

कोयना धरण महत्त्वाचं, या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो”सगळ्या नागरिकांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे.जसं- जसं पाणी ओसरेल तसं तसं पंचनामे केले जातील.दानशूर लोकांना सरकार आवाहन करत आहे, जास्तीत जास्त लोकांनी मदतीसाठी पुढे या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *