काम-धंदा

सरकार देणार नववर्षाची भेट; कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार नववर्षानिमित्त एक खास अशी भेट देणार आहे. त्यांच्या पगारामध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

येत्या काही दिवसांमध्ये सरकार महागाई भत्त्यामध्ये (डीए) चार टक्क्यांची वाढ करेल, असा वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचा अंदाज आहे. ही वाढ जर मिळाली तर कर्मचाऱ्यांचा पगार 750 रुपये ते 10,000 रुपयांनी वाढू शकतो. ही पगारवाढ जर झाली तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात महागाईचा दर वाढत गेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, यात किती वाढ करावी, हे महागाई किती वाढली यावर अवलंबून असते. गेल्या सहा महिन्यांतील महागाईचा वाढता दर बघता सरकार न्यू ईयर गिफ्ट देण्याची तयारी करू शकते, असे काही कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.