काम-धंदा

‘एचपी’च्या भारतातील 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

खासगी संगणक व प्रिंटर उत्पादनातली नावाजलेली कंपनी एचपीच्या भारतातील 500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या आठवड्यातच कंपनीने याबाबत माहिती देताना, वर्ष २०२० पर्यंत जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी केले जातील अशी शक्यता वर्तवली होती. नफा वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कार्यप्रणाली पुनर्रचनेअंतर्गत ही कपात केली जाणार आहे. जगभरात ‘एचपी’चे ५५ हजार कर्मचारी आहेत. भारतातील किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.