काम-धंदा

नोकरीच्या शोधात आहात? मग रेल्वेमध्ये आहे ‘या’ पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी  एक गुडन्यूज आहे. रेल्वेमध्ये लिपिक या पदांसाठी भरती निघाली आहे. आजपासून (20 डिसेंबर) अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे.

कनिष्ठ लिपिक पदाच्या १७१ तर वरिष्ठ लिपिक पदाच्या ८० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २५१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

12 वी पास असलेल्या उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. तसंच उमेदवारांना टायपिंग येणं अनिवार्य आहे. यासाठी इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट आणि हिंदीचा टायपिंग स्पीड २५ शब्द प्रति मिनिट असावा लागेल. तर वरिष्ठ लिपिक वर्गासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.