काम-धंदा

तरुणांसाठी गुडन्यूज; खाजगी क्षेत्रात मिळणार 7 लाख नोकऱ्या, 8 टक्क्यांनी होणार पगारवाढ

अनेक तरुण आज नोकरी मिळत नसल्यामुळे तणावात आहेत. चांगली नोकरी मिळावी यासाठी ते धडपड करताना दिसत आहे.  मात्र तरुणांनो आता काळजी सोडा. तुम्हाला नवीन वर्षात गुडन्यूज मिळणार आहे. नव्या वर्षात (2020) खाजगी क्षेत्रात 7 लाख नोकऱ्या निर्माण होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसेच 8 टक्क्यांनी तुमच्या पगारामध्ये वाढ देखील होणार आहे.

बंगळुरू, मुंबई, दिल्ली NCR, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे ही शहरं रोजगार निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत. या शहरांमध्ये एकूण 5 लाख 14 हजार 900 नोकऱ्या निर्माण होतील, असं अनुमान काढण्यात आलंय.

2020 मध्ये सगळ्यात जास्त रोजगार ई कॉमर्स क्षेत्रात निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. आयटी, आरोग्य क्षेत्र, औद्योगिक उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा या क्षेत्रांतही जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील.

देशातली आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची समस्या वाढत चाललीय. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात यावर काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.