काम-धंदा

LIC – एलआयसीमध्ये नोकरीची मोठी संधी; ८५०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

तुम्ही नोकरी शोधात असल्यास ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. LIC मध्ये मेगा भरती आहे. भारतीय आयुर्विमा मंडळात ८५०० पदांवर भरती केली जाणार आहे. क्लार्क, कस्टमर सर्विसेस एक्झिक्युटिव्ह, सिंगल विंडो ऑपरेटर या पदांसाठी ही भरती आहे. या ८५०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही https://www.licindia.in/ इथे क्लिक करा.

अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली असूनऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे १ ऑक्टोबर २०१९. ऑनलाइन परीक्षेची तारीख आहे २१ आणि २२ ऑक्टोबर २०१९. काॅल लेटर डाऊनलोडची तारीख १५ ऑक्टोबर २०१९. पूर्व परीक्षेची तारीख आहे २२ ऑक्टोबर २०१९.