काम-धंदा

नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालयात मोठी संधी

तुम्ही वकिलीचा अभ्यास केला असेल तर नोकरीची चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयात 51 जागांवर भरती आहे. लाॅ क्लार्क या पदांवर ही भरती केली जाईल. मुंबईबरोबर नागपूर आणि औरंगाबाद इथेही व्हेकन्सी आहेत.

खंडपीठ आणि पदसंख्या : मुंबई- 23, नागपूर – 14, औरंगाबाद – १४

शैक्षणिक पात्रता : पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण हवं. किंवा LLM ही पदवी हवी. वयाची अट : 21 ते 30 वर्षापर्यंत वय हवं. अर्जाची फी नाही. अर्ज 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
द रजिस्टारर, हाय कोर्ट, अपेलॅट साइड, बाॅम्बे, 5वा मजला, नवी मंत्रालय बिल्डिंग, जी.टी. हाॅस्पिटल कम्पाउंड, अशोका शाॅपिंग सेंटर, क्राॅफर्ड मार्केटच्या जवळ, एल.टी.मार्ग, मुंबई – 400001 (The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001)