काम-धंदा

नोकरदारांसाठी गुडन्यूज; आता तुमच्या हातात येणार जास्त पगार

नोकरदारांसाठी एक गुडन्यूज आहे. दर महिन्याच्या पगारातून कट होणारी पीएफची रक्कम आता तुम्हाला कमी करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या हातात जास्त पगार येऊ शकतो.

येत्या आठवड्यात सरकार सोशल सिक्युरिटी कोड 2019 संसदेत सादर करू शकतं. या विधयेकात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता कर्मचारी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून कमी पैसे कापले जाण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे पगाराच्या 12 टक्क्यांपेक्षाही प्रॉव्हिडंट फंडासाठी कमी पैसे देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांकडे असेल. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आधीच मंजुरी मिळाली आहे. आता संसदेतही हे विधेयक मंजूर झालं की इपीएफओ (EPFO) या नियमाचे नोटिफिकेशन काढेल.

हा नियम अमलात आणण्यासाठी मागच्या 5 वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण हे विधेयक सोशल सिक्युरिटी विधेयकासोबतच सादर होणार आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय आता सरकारच घेईल.

जर हे विधेयक मंजूर झाले तर कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा ज्या कर्मचाऱ्यांना मुळातच पगार कमी आहे त्यांना होणार आहे. कारण त्यांचा पीएफ कट होऊन त्यांच्या हातात पगाराची खूप कमी रक्कम येते. त्यामुळे अशा नोकरदारांना हे विधेयक जर मंजूर झाले तर मोठा दिलासा मिळेल.