बनमस्का, मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितीश दाते आणि तुझ्यात जीव रंगला, दिल दोस्ती दुनियादारी फेम ऋचा आपटे यांनी आपल्या साखरपूड्याचा फोटो नुकत्याच इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. या पोस्टमधील विशेष म्हणजे हा साखरपूडा होऊन आता एक वर्ष झालं. या दोघांनी हे आत्ता पहिल्यांदाच एका वर्षानंतर इंस्टाग्रामला टाकलं आहे.
ही पोस्ट पाहू सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या जोडीने बनमस्का या मालिकेत एकत्र काम केलं होत. मित्र -मैत्रिणींच्या जीवनावर आधारित ही मालिका लोकांची अजूनही आवडती आहे. पुण्याचे असणारे ऋचा आणि क्षितीश हे दोघे मालिकां बरोबरच नाटकात ही काम करतात.
मुळ पॅटर्न मधला रांगडा गण्या करणारा क्षितीश स्वतः नाटकांचे दिग्दर्शन ही करतो. ऋचाने केलेली तुझ्यात जीव रंगला मधील सखीची भूमिका देखील लोकांना आवडली. या दोन्ही यशस्वी मराठी कलाकारांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी
मराठी कडून हार्दीक शुभेच्छा !!