पश्चिम महाराष्ट्र पुणे बातमी महाराष्ट्र

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाच्या 2890 घरांची होणार सोडत ! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) च्या वतीनं गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2890 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं या सोडतीचा प्रारंभ होणार आहे.

म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितलं की, 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 13 मे 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत इंच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या सोडतीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी https://lottery.mhada.gov.in/ आणि www.mhadamaharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

22 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच 2 महिन्यांपूर्वी म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 5646 सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. यांतर या वर्षीतील ही दुसरी सोडत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे.

आता होणाऱ्या सोडतीच्या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस व्ही आर, श्रीनिवास उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *