आरोग्य

घरी RO किंवा फिल्टर नसेल तर पाणी साफ करन्याचे हे घरगुती उपाय नक्की वापरून बघा..

1.75Kviews

आता तर भारतातील बरचश्या घरांमध्ये पाणी साफ करण्यासाठी RO चा वापर केल्या जातो. पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे का कि जेव्हडा पाणी तुम्हाला RO मधून शुद्ध होऊन भेटते त्यपेक्षा अधिक पटीने पाणी वाया जाते. आणि दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जाण्याचं हे हि एक कारण असू शकते. पण विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे कि जेव्हा RO किंवा फिल्टर नव्हते तेव्हा लोक पाणी कशे साफ करून पिण्या योग्य बनवत असतील…

 

१) शेवग्याच्या शेंगा आणि तुळस – पाण्याच्या मडक्यात शेवग्याच्या शेंगा आणि तुळशीची काही पाने टाका. हा दूषित पाणी शुद्ध करण्याचा एक चांगला उपाय मानला जातो.

२) टोमॅटो आणि सफरचंदाची साल – टोमॅटो आणि सफरचंदाची साल अल्कोहोलमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवा. नंतर ही साल काढून उन्हात वाळत ठेवा. सुकल्यानंतर ही साल पाण्यात टाका. २ ते ३ तासांनंतर पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
३) जांभुळ आणि अर्जुन झाडाची साल – दूषित पाण्यात जांभुळाच्या आणि अर्जुन झाडाची साल सोबतच काही तुळशीची पाने टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पाणी गाळून एका भांड्यात भरा. याने पाणी शुद्ध होतं.

४) खसखस आणि दही – पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्ही पाण्यात दह्यासोबत खसखसही टाकू शकता. खसखसमध्येही पाणी शुद्ध करण्याचे गुण असतात.
५)  निर्गुंडी – निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. एका मडक्यात पाणी भरून त्यात निर्गुंडीची पाने ३० मिनिटांसाठी टाकून ठेवा. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो.
६)दही – मध्य प्रदेशातील आदिवासी लोक पाणी शुद्ध करण्यासाठी दह्याचा वापर करतात. हे लोक डोंगरातून खाली येणारं पाणी एका ठिकाणी अडवून ठेवतात आणि त्यात एक कप दही मिश्रित करतात. दही पाण्यातील बॅक्टेरियाला आकर्षित करतं. काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.

७)  लिंबाचा रस – नळाचं पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. पाण्यात असलेला बॅक्टेरिया लिंबाच्या रसाने ३० मिनिटात नष्ट होऊ शकतात. 
८)निर्मलीच्या बीया – निर्मली झाडाचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या झाडाच्या बीया बारीक करून पाण्यात टाका. या बीया पाण्यात २ ते ३ तासांसाठी तशाच राहू द्या. याने पाणी शुद्ध होईल.
९) केळीची साल – केळीच्या सालीमध्ये पाण्यातील तांबे आणि शीसं यांसारखे धातू नष्ट करण्याचे गुण असतात. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी केळीच्या सालीचाही वापर करू शकता.
१०) सूर्याची किरणे – दूषित पाणी उन्हात ठेवा. सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे पाण्यातील कीटाणू नष्ट होतात. हे पाणी नंतर पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.

Leave a Response