लाइफफंडा

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याच्या सवयीमुळे होतील ‘हे’ आजार

अनेकांना जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक असल्याचा सल्ला डॉक्टर देखील आपल्याला देतच असतात तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जेवणानंतर लगेच पाणी पिण्याच्या सवयीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. शरीरात न पचलेलं अन्न तसंच राहतं. न पचलेल्या अन्नापासून बनलेल्या ग्लुकोजमुळे शरीरात फॅट तयार होतात. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने एन्जाइम कमकूवत होतात. एन्जाइम पचनप्रकिर्येसाठी फार आवश्यक असतात. पाचक रस कमी झाल्यामुळे शरीरात अल्मीय स्तर वाढतो. यामुळे असिडिटी होऊ शकते किंवा हृदयात जळजळ वाटू शकते. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. कारण जेवण पचायला सुमारे दोन तास लागतात. जेवण पचताना कठीण पदार्थांचं योग्य पद्धतीने पचन होणं आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने ही पचनक्रिया बिघडते.

३० मिनिटांच्या आत पचनक्रियेची दुसरी प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ३० मिनिटांनी पाणी प्यायल्यास त्याचा परिणाम पचनप्रक्रियेवर होत नाही.

टीपः या लेखातील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.