लाइफफंडा

लॉकडाऊनमध्ये असे राहा तुम्ही पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. त्यामुळे पुढचे 21 दिवस सगळ्यांना घरात बसून राहायचे आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की, एवढे  दिवस घरी बसून करायचे काय? त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार देखील येत असतील त्यासाठी आज आम्ही तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात पॉझिटिव्ह कसे राहायचे  याची माहिती देणार आहोत.

स्वयंपाकातूनही एक वेगळा आनंद मिळतो. घरी असताना तुमच्या आवडीचा स्वयंपाक करा. हार्वर्ड हेल्थ ब्लॉगनुसार असं केल्यानं डिप्रेशनचा धोका 25 ते 30 टक्के कमी होतो.

चांगले चित्रपट पाहिल्याने डोपेमाइन हार्मोनची निर्मिती होते, ज्यामुळे मन आनंदी राहतं.

मेंदू निरोगी राहावा यासाठी त्याला रिचार्ज करा. बुद्धिबळासारखे खेळ खेळा, शब्दकोडे सोडवा यामुळे अल्झायमरसारखे आजार बळावण्याची शक्यता 2.5 टक्के कमी होते.

संपूर्ण दिवसभरात किमान 45 मिनिटं काहीतरी क्रिएटिव्ह करा, तुमचे छंद जोपासा. ज्या कशाचीही तुम्हाला आवड आहे ते करा.जर्नल ऑफ द अमेरिकन आर्ट थेरेपीनुसार यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल.