लाइफफंडा

घरी बसून काम करताना अशी घ्या काळजी

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजणांना वर्क फ्रॉम होम सांगितले आहे. पण वर्क फ्रॉम होम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

घरी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, ज्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या उद्भवते.

ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. घरी असल्यावर अनेक जण बेडवर झोपून किंवा आडवं पडून काम करत असाल तर त्यामुळे कमरेत वेदना होतील.

बसण्यासाठी योग्य उंचीचं टेबल आणि खुर्चीची व्यवस्था करावी. अगदी कमी किंवा अगदी जास्त उंचीची खुर्ची टेबलामुळेदेखील पाठीच्या समस्या उद्भतील.

बहुतेक लोकं ऑफिसमध्ये भरपूर पाणी पितात मात्र घरी तितकं पाणी पित नाही. पाणी कमी प्यायल्यानंदेखील डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे घरातून काम करताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. पाणी पित राहा. यामुळे ऊर्जाही मिळते.