लाइफफंडा

चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

आपण अनेकदा चहा आरोग्यासाठी किती घातक आहे हेच ऐकले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला चहा पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत.

नुकत्याच एका संशोधनातून असे समोर आले की, चहा पिल्याने मेंदू तल्लख होतो. आणि काम करण्याची कार्यक्षमता देखील वाढते.

सकाळी उठल्यानंतर जे चहा पितात त्यांना अधिक ताजतवान वाटत असल्याचे देखिल समोर आले आहे.

चहा प्यायल्याने मेंदूच्या संरचनेवर सकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर नियमितपणे चहा प्यायल्यास मेंदूत वृद्धाची लक्षणं फार उशीरा दिसू लागतात. अशी माहिती नॅशनल युनिवर्सिटी ऑफ सिंगापुरचे प्राध्यापक फेंग ली यांनी या संशोधनातून सांगितली आहे.