लाइफफंडा

मोबाईल कव्हर करणार आता तुमचे आजारांपासून संरक्षण

मोबाईलला सुरक्षा देणारा मोबाईल कव्हर आता तुमच्याही आरोग्याचे संरक्षण करणार आहे. तुम्हाला आजारी पाडणाऱ्या अनेक जंतूंचा तो नाश करणार आहे आणि आजारांपासून तुमचे संरक्षण करणार आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डच्या (University of Sheffield) संशोधकांनी एक असा पदार्थ तयार केला आहे, ज्याचा वापर जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर (उदा. मोबाईल दरवाजांचे हँडल, खेळणी इ.) केला जाऊ शकतो.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटीमायक्रोबियल पदार्थ बायोकोटे बी 65003 ला लेजर सिनटेरिंग पावडर सोबत एकत्र केलं आहे आणि एक अँटीमायक्रोबियल पदार्थ तयार केला आहे. ज्याचा वापर प्रत्येक प्रकारच्या वस्तूंमध्ये केला जाऊ शकतो.

प्रयोगशाळेत अनेक विषाणूंवर याचं परीक्षण करण्यात आलं आहे. बहुतेक अशा आजाराच्या विषाणूंचा नाश करण्यात हा पदार्थ सक्षम असल्याचं दिसून आलं आहे.  या पदार्थाचा प्रयोग लॅबमध्ये निर्मित मानवी पेशींवरही करण्यात आला आणि मानवी पेशींसाठी सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.