इतर बातमी वायरल झालं जी विदेश

ऐकावं ते नवलंच ! पोलिसांसमोर गॅस सोडला म्हणून ठोठावला 45 हजारांचा दंड

ऑस्ट्रियातून एक अशी घटना समोर आली आहे जी वाचल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. तुम्ही चकितही व्हाल. पोलिसांसमोर गॅस सोडला म्हणजेच पादण्याचा गुन्हा केला म्हणून एकाला 45 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

व्हिएना शहरातील एका पार्कमध्ये एक व्यक्ती आपल्या मित्रांसोबत बसला होता. पोलीस अधिकारी रुटीन चेकिंगसाठी तिथं आले. यावेळी त्या व्यक्तीनं गॅस सोडला.

डेली मेलच्या वृ्त्तानुसार, सदर व्यक्ती पोलिसांना पाहून मुद्दाम बेचंवर उभा राहिला आणि त्यांच्याकडे पाठ करत जोरात गॅस सोडला. सार्वजनिक अभद्रतेचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला दंड ठोठावला.

पोट फुगणं, गॅस सोडणं ही नैसर्गिक क्रिया आहे, भले ते मुद्दाम का केलं असेना. अभिव्यक्ती स्वांत्र्यासाठी याला मूलभूत अधिकाराच्या रुपात पाहिलं पाहिजे असं सांगत त्यानं कोर्टात धाव घेतली.

2020 सालची ही घटना असून अनेक महिने कोर्टात याबाबत खटला चालला. अखेर केसचा निकाल लागला आहे. कोर्टानं आरोपीला दिलासा देत 45 हजारांचा दंड 9 हजार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *