बातमी महाराष्ट्र राजकारण

गरज व क्षमता असूनही महाराष्ट्राला केंद्राकडून कमी लस पुरवठा

महाराष्ट्राने केंद्राकडे तीन कोटी लसीचे डोस मागितले होते पण केंद्राने मात्र 2 कोटीच लस देण्याचे मान्य केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे अतिरिक्त लसीची मागणी केली होती.मात्र उत्तर प्रदेश आणि गुजरातला मात्र भरघोस लस देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला गजरेपेक्षा कमी लस दिली आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात दररोज नऊ ते ११ लाख लसींचे डोस दररोज देण्यात आले आहेत. राज्यातील साडेचार हजार लस केंद्रांच्या माध्यमातून रोज १५ ते २० लाख लस मात्रा देण्याची क्षमता असताना रोज दोन ते तीन हजार केंद्रांवर लस मात्रा दिल्या जातात. केंद्राकडून केल्या जाणाऱ्या लस पुरवठ्यावर आपण प्रामुख्याने अवलंबून असल्याने अनेक ठिकाणची लस देणारी केंद्र बंद ठेवावी लागत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव व उच्चपदस्थाना बरोबर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच आरोग्य विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्या 26 ऑगस्ट रोजी रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील रुग्ण संख्या, सक्रिय रुग्ण तसेच लसीकरण करण्याची क्षमता व गरज यांची माहिती देऊन मुख्य सचिवांनी राज्यासाठी तीन कोटी लसींच्या मात्रा देण्याची मागणी केली होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *