बातमी महाराष्ट्र वायरल झालं जी

महापोर्टच्या परीक्षा MPSCघेणार, मुलांनो अभ्यासाला लागा..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षाचं आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी अनेक दिवसांपासून करत होते.विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत विचारणा केली होती.

त्यानुसार लोकसेवा आयोगानं राज्य सरकारला त्यांची भूमिका कळवली आहे.लोकसेवा आयोगाने आपली भूमिका कळवली आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *