बातमी राजकारण

भावाच्या मृत्यू नंतर ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय ,पश्चिम बंगालमध्ये अखेर लॉक डाऊन जाहीर

नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुका फार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार बहुमताने सत्तेत आले.निवडणुकीच्या काळात कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुटवत निवडणूक पार पडल्या.मोठ्या सभा ,मिरवणुका यामुळे या निवडणुकीची प्रचंड चर्चा झाली.

निवडणुकीच्या काळातील गर्दी पाहता.त्यांतर कोरोना उद्रेक होणार हे नक्की होते.अगदी तसेच झाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसाचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.

16 मे रोजी पहाटे 6 वाजल्यापासून ते 30 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधु असीम बॅनर्जी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या एक महिन्यांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते.आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *