बातमी महाराष्ट्र वायरल झालं जी

‘मटणवाले चाचांनी घेतली पोलिसांची परीक्षा,काही पोलिस पास काही मात्र नापास

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे त्यांच्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जातात.पूर्वीच्या काळी राजे-महाराजे वेशांतर करून आपल्या जनतेची ख्याली ,खुशाली जाणून घेत.कृष्ण प्रकाश यांनी देखील काल असाच एक फंडा वापरला.

पोलिस नागरिकांशी कसे वागतात हे जाणून घेण्यासाठी काल चक्क मटनवाले चाचा बनले.पोलिसांची परीक्षा घेतली काही पोलिस पास झाले तर काही पोलिस नापास झाले.मध्यरात्री तब्बल चार तास त्यांनी यांची पाहणी केली.कपडे,गोल टोपी,आणि दाढी केस असा पेहराव करून कृष्णप्रकाश एका खाजगी वाहनातून बाहेर पडले.

हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये ते स्वता तक्रारदार म्हणून गेले. हिंजवडी, वाकड येथील पोलिस परीक्षेत पास झाले पण पिंपरीमधील पोलिसाना मात्र मेमो मिळाला.तब्बल चार तास परीक्षा घेतल्या नंतर कृष्ण प्रकाश पुन्हा त्यांच्या वर्दीत आले.जे पोलिस परीक्षेत पास झाले त्यांचे त्यांनी कौतुक केले.इतरांना मात्र मेमो बजावला.कृष्ण प्रकाश यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *