काम-धंदा मुंबई यशोगाथा वायरल झालं जी

हा ‘श्रावणबाळ’ पुरवतो तब्बल २०० आजी-आजोबांना मोफत टिफिन .

आजकालचे मुलं-मुली आई वडील नको म्हणून त्यांना घराबाहेर काढत आहेत. आजही आपण बाहेर जेंव्हा पाहू तेंव्हा अनेक वृद्ध जोडपे भीक मागताना, रस्त्यावर झोपलेले दिसतात. ते दृश्य पाहून नकळत डोळ्यात पाणी येतं . आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो कि यांच्या मुलांना काय जड जातं याना सांभाळायला. कित्येक मुलांची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती चांगली असताना देखील ते म्हाताऱ्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. तेंव्हा त्या थकलेल्या म्हाताऱ्या आई-वडिलांच्या मनाची काय घालमेल होत असेल याची कल्पना देखील मनाला सुन्न करते.

पण त्यांची हि घालमेल समजून घेण्यासाठी मुंबई मधला एक ‘श्रावणबाळ’ समोर आला आहे. त्यांचं नाव आहे डॉ. उदय मोदी. ते सांगतात कि, ” दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे एक ७८ वय वर्षाच्या वृद्ध उपचार घ्यायला आले होते, त्यांच्याकडे वडापाव खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यांच्या पत्नीला पॅरालिसिस आहे आणि त्या काहीही काम शकत नव्हत्या. त्यांना ३ मुलं असून देखील त्यांचा एकही मुलगा सांभाळ करत नव्हता. ना त्यांना मुलं पैसे पुरवत होते ना जेवण.

त्यांची अवस्था पाहून डॉक्टर मोदींचे मन भरून आले. तेंव्हापासून त्यांनी मनाशी निश्चय पक्का केला आणि वृद्धांसाठी मोफत टिफिन पोहच करणे सुरु केले. त्यांनी जागोजागी पत्रक लावले कि ज्या वृद्धांना जेवण्याची सोय नाही किंवा ज्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नाहीत अशा वृद्धांनी मला संपर्क साधावा. आणि या पत्रकाला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला आणि आज त्यांच्याकडे २०० पेक्षा जास्त वृद्ध जोडप्यांची जेवणाची जबाबदारी आहे.

डॉ. उदय मोदी पेशाने डॉक्टर आहेत. मुंबईमध्ये रुग्णांवर उपचार करत करत ते वृद्धांची देखील सेवा करतात. ते मूळचे गुजरात मधील राजकोट शहरातील आहेत. पण ते कामानिमित्त मुंबईला स्थित झाले. त्यांना असे अनेक वृद्ध आजी-आजोंबांच्या सोबत ओळख झाली त्यांना दोन-तीन अपत्य असून देखील यांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे किंवा घरातून हाकलून लावले गेले.

यातील काही वृद्ध हे भाड्याने खोली करून राहतात तर काही वृद्धाश्रमात राहतात. यातली काही बेघरदेखील आहेत. त्यांच्या जेवणाची सोय नसायची. थकलेल्या अवस्थेत काम न करू शकणाऱ्या वृद्धांना, यातली काही वृद्ध आजारी देखील आहेत. त्यांना पोषक आहार घरपोच मिळावा यासाठी डॉ. मोदीने टिफिन सेवा सुरु केली आणि याचा त्यांना जवळपास ३ लाखांपर्यंत खर्च येतो. कुटुंबाचा खर्च सांभाळत त्यांना हि योजना सुरु ठेवण्यासाथीचा खर्च सांभाळणे एक आर्थिक आव्हान आहे.

ज्या भावनेपोटी त्यांनी हि सेवा सुरु केली त्या सेवेला देखील तसेच ‘समर्पक असे ‘श्रवण टिफिन सर्व्हिस’ नाव दिले आहे. हि सेवा ते मुंबईतल्या मीरा भायंदर इथून पुरवतात. हळूहळू लोकांना कळत गेले कि मोदी किती प्रामाणिकपणे सर्व वृद्धांची सेवा करतात त्यामुळे मुंबईकरांना डॉ. मोदींचे खूप कौतुक वाटते.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *