देश बातमी राजकारण

मोदी शहा यांनी देशाचा आत्मा असलेल्या लोकशाहीवर हल्ला चढविला आहे- राहुल गांधी

पेगासस प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.पेगाससचं आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं.पण हे हत्यार देशयाविरोधात वापरलं जातं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा आत्मा असलेल्या लोकशाहीवर घाव घातला आहे.

असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढविला आहे.पार्लमेंट चेंबरमध्ये आज कॉंग्रेससह 14 विरोधी पक्षाची बैठक पार पडली.त्यानंतर राहुल गांधी 14 पक्षांसाह मिडियाला सामोरे गेले.यावेळी राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला.देशांतील सर्व विरोधक एकवटले आहेत.सर्व पक्षाचे नेते आहेत.आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे.

आमचा केवळ एक प्रश्न आहे.केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली आहे की नाही हे स्पष्ट करावे.केंद्र सरकारने देशातील नागरिकांची हेरगिरी केली की नाही हे स्पष्ट करावं.पेगाससवर संसदेत चर्चा होणार नाही,असं केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.मोदी सरकारने तुमच्या मोबाईलवर एक शस्त्र टाकलं आहे.जे माझ्याविरोधात,तुमच्या विरोधात हेरगिरी करण्यासाठी वापरलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *